विस्थापितांची कहानी...
काल ताडोबा अभायारान्यतिल, चिमुर ,तालुक्यातील जामनी या छोट्याष्या, २५० लोकवस्ती असलेल्या, गावी गेलो होतो. हे गाव आता उठणार आहे. वन विभागाचा आरोप असतो की गावकरीच प्राण्यांची ह्त्या करतात. म्हणुन हे जाणार. जवळपास एक वर्षापुर्वी बोटेझरि हे गाव इथल्या जंगलातून उठविले. त्याना भगवानपुर नावाची नविन वस्ति दुसरीकडे जन्गलाबाहेर २२ किमी वर दूर करून दिली. तिथे एक घर बांधून दिले. शेतीची जागा दिली, कही पैसे दिले. त्या गावात ६०% लोकांकडे स्वताची जमिन होती आणि ४० % लोक बेघर वस्तीतील होते. सरकारने सगळ्याना ४ एकर शेती दिली. त्यामुळे आधीचे भूमिहीन खुश झाले. वर्षभरानंतर अशी परिस्थिथि आहे की जो तलाव गाव तलाव होता तो सरकारी अधिकाऱ्यांनी वर कळवताना शेत तलाव म्हणुन सांगितला होता. तो तलाव खाली आहे आणि उंच टेकडावर शेतीची जागा आहे. त्यामुले शेतीला पाणी नाही. एकाच वर्षात घराला मोठे मोठे तडे गेले. काही घरे पडली देखिल. त्यामुले निक्रुस्ट दर्जाचे काम उघडे पडले. भगवान् नावाचे वन अधिकारी ज्यांच्या नावावर हे गाव वसले. ते इथून बदली होउन निघून गेले. या लोकाना भगवान भरोसे सोडून.
बाकी बऱ्याच बडया अधिकारयाना बक्षिसे आणि पुरस्कार मिळाले, यशस्वी पुनर्वसनाचे. आता उन्हाळ्यात शेवटी काही गवाकर्यानी पायी २२ किमी जंगल तुडवत भर उन्हा तान्हात लपून छपुन आपल्या गावापर्यन्त प्रवास केला. काही तेंदुपत्ता आणि मोहफुले तोडून वीकायचे, असे ठरवून आणि मग विचार केला की पावसाळा जवळच आहे....शेती करू....आपलीच तर आहे....बाम्बुच्या झोपड्या केल्या आणि लगेच वन विभागाने अटक केली....एकून १७ लोक, पैकी एक छोटा मुलगा,..काही बायका,...मुलगा छोटा आहे हे लक्षात आल्यावर सारवासारव करण्यासाठी......त्याला अनाधिकृत रित्या सोडून दिले.....(रिकॉर्ड पहिला तेव्हा लक्षात आहे...FIR मध्ये क्रमांक १ ते १७ वर कारवाई असे लिहिलेले आहे...आणि आत यादी मात्र १६ ची च आहे...तेव्हा कळले..)..त्यांच्यावर वन्यजिव संरक्षक कायद्या सह अनेक गंभीर कलमे लावली आहेत....२१ मे पासून ते अटकेत आहेत.....अजुन सुटका नाही.....त्यानी सांगितले..."आम्हाले खंडी खंडी धान होत् होते जी....आता कहिस नाही....आम्ही बरबाद झालो जी." त्या गावातील जे सधन होते त्यांचीच ही अवस्था झालीय...जे भूमिहीन होते त्याना जे मिळाले त्यात ते समाधानी आहे...एक घर..शेती...कशीही का असेना..खुश....
सरकारी अधिकारी पुनर्वसन यशस्वी झाले हे दाखविण्यासाठी याच लोकांच्या सह्या आणि अभिप्राय पुढे करतात...ज्या वन्यजीव अभ्यासक संघटना आहेत त्याना ४ वर्षापूर्वी हा विषय आला तेव्हा असे खरेच वाटत होते...की गावाकरीच प्राणी मारतात......मी विरोध केला.....तो गावकरी माणूस सुध्हा त्याच ecosystem चा एक भाग आहे ...इतक्या वर्षापासून त्याचे पूर्वज याच प्राण्यान्च्या सानिध्यात राहत आहेत...मोठ्या प्राण्यांची शिकार करणारे गावकरी नसतात....त्यात अंतर राज्यीय टोळ्या सक्रीय असतात। मोठ्या प्राण्यांची शिकार करुन त्यातून पैसे बनाविने हे एक सुनियोजित षडयंत्र असते.......गावकरी मोठी वृक्षतोड़ पण करीत नाहित....फ़क्त सरपनासाठी काड्या नेतात...तेहि वाळुन खाली पडलेल्या...जंगलाला आग लगते तेव्हा गावकरीच वन विभागाला कळवतात...आणि वन विभागाचे कर्मचारी यानीच आग लावली म्हणुन आरोप करतात...हे याही वेळेस झाले..ते का म्हणुन लावतील आग....त्यांचे एका वर्षाचे सरपन गेले...नुकसान त्यांचेच....त्याना हेही कलते की आग लावल्याने प्राणी मारत नाहीत..ते पळुन जातात आणि परत येतात... बरेच मुद्दे पटवून दिले......आत्ता एक पुनर्वसन बघितले तेव्हा कुठे सगळ्यांचे डोळे उघडले...देशात जिथे कुठे पुनर्वसन झाले...तिथे आज मोठ्या व्यावसायिकांचे होटल्स आहेत....
म्हणुन परवा जामनी ला गेलो होतो....... जामनी हे पुनर्वसनाच्या यादीतील पुढचे गाव..आता यांचा नंबर...या गावातील जवळपास सगल्यांकडे ५ ते 6 एकर शेती आहे..छान पिकते ती...खाऊन पिउन सुखी...गावात सौर उर्जेने दिवे चालतात..मोठे मोठे सौर उर्जेचे प्यानल आहेत...गावाला लागूनच तलाव आहे.गावात प्राथमिक शाळा आहे। एक स्वयंपूर्ण गाव. ज्याला निसर्गाच्या सोबत अजुन विकासासाठी वाव आहे. एकीकडे आत्महत्या करणारे शेतकरी आणि मरूद्यान झालेल्या शेत्य बघितल्या तर हे गाव त्याना का म्हणुन सोदावेसे वाटावे?. त्याना इथून गेल्यावर लगेच पिकनारी शेती कोण देणार ?. सरकारने काय तयार करून ठेवल्यात अश्या शेत्या? त्याना आता कळाले...पुनर्वसन यशस्वी होत् नाही. १००% पुनर्वसन कधीच होऊ शकत नाही. सर्व गावकरी आता सावध आहेत. परत पाउस पडून रोड पूर्ण ख़राब व्हायच्या आधी एक दोनदा जाईन.....एकीकडे मोठ्या खाजगी उद्योगाना buffer zone लगत जागा मिळवुन देण्यासाठी सर्व राजकीय पक्ष पुढाकार गेतात...लोहारा जुनोना सारखे, सतत वाघांचा वावर वाढत असलेले जंगल कोळसा खानी साठी देतात...आणि दुसरीकडे याच जमीनी वर कित्येक वर्षापासून वसलेली गावे विस्थापित करतात. देशातील ६०% लोकानी मिळुन ४०% लोकांचा जीव घेण्याचा हा सुनियोजित कट...बाकी काही नाही. हा देश आता कृषिप्रधान राहिलेला नाही. आणि कृषि सारख्या मुळ उद्योगाला मुठमाती देऊन आपण उद्योजक देश्यांच्या पन्क्तितहि बासु शकत नाही. देशातील राजकारणी लोकाना शेती वर प्रेम नहीं..फ़क्त शेताकर्याचे लाड पुरवायाचे...तेहि निवडनुकिच्या काही दिवस अगोदर. कारण शेती मत देत नाही. शेतकरीच देतो...
या सर्व प्रकारावर आपले मत अवश्य नोंदवा...सकारात्मक, नकारात्मक....माझ्याशी सहमत...विसंगत...कसेही....पण मत...अगदी निर्भीड....जे विचार करायला भाग पाडेल....आणि कदाचित कहिना कृतीशीलही बनवेल...
कळावे लोभ असावा
आपला
सचिन
:
Subscribe to:
Post Comments (Atom)
Hi Sachin,
ReplyDeleteI am inspired! Great article! Please be join network chandrapur and send mail to network@chandrapur.co.in for more awarness about Lohara forest. I am also going to start a blog because I went to yours and loved it!
Thanks
Amit Poreddiwar
Chandrapur
9822234493